पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यास निदर्शनाद्वारे तीव्र विरोध करणार ; सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचा इशारा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने १ ऑगस्ट २०२३ रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मात्र पंतप्रधान मोदींकडे रेडझोन क्षेत्र कमी करण्यासंधर्भात या पूर्वी अनेकदा मागणी केलेली असताना जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. पार्श्वभूमिवर निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पंतप्रधानांच्या 1 ऑगस्टच्या दौर्यास निदर्शनाद्वारे विरोध करणार असल्याचा इशारा दिला आहे.

१ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणार्‍या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्काराने गौरविले जाईल. यंदा या पुरस्काराचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे. तसेच या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्‍वस्त सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधानपदी असताना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करावा लागला होता. तर डॉ. मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांना ते पंतप्रधान होण्यापूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *