समृद्धी महामार्गाबाबत सरकारचा मोठा निर्णय ; आता……….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे अघात होताना दिसत आहेत. हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनत आहे. काही दिवसांपुर्वीच या महामार्गावर बुलढाणा येथे सगळ्यात मोठा अपघात झाला होता. तर झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर आता राज्य शासनाने यावर उपाययोजना करण्यासाठी रस्त्यालगतच्या सोयी सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

यात फुडमॉल असणार आहेत. ज्यामुळे अपघात कमी होण्यास मदत होईल. याचबरोबर आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारने दुसरा मोठा निर्णय घेताना, समृद्धी महामार्गावर लवकरच एअर अ‍ॅम्बुलन्स सेवा सुरू करणार आहे. जर महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना तातडीने मदत मिळावी एअर अ‍ॅम्बुलन्सची सेवा देण्यात येणार आहे. तर याबाबात सरकारकडून अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांशी बोलणी सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *