पालखी सोहळ्यातील परतीच्या प्रवासातील वारकऱ्यांना निगडी येथे खिचडी वाटपाचे आयोजन

Spread the love

कै. किरण काळभोर प्रतिष्ठानच्या वतीने उपक्रम, जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन

पिंपरी-चिंचवडः
आषाढी वारी निमित्ताने संत तुकाराम महाराज पालखी परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. उद्या (गुरुवार, 13 जुलै रोजी) निगडी येथील शेवटच्या टप्प्यात संत तुकाराम महाराज पालखी निगडी येथील लोकमान्य टिळक पुतळा समोर सकाळी आठ वाजता आगमन होणार आहे. त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वारकरी बांधवांना कै. किरण सुदाम काळभोर प्रतिष्ठानच्यावतीने संत तुकाराम महाराज पालखी वारकरी बांधवांना खिचडी वाटप तसेच चहा नाश्ता पाणी बॉटल वाटप व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच निगडी गावठाण तसेच यमुनानगर कॉर्नर प्राधिकरण येथील नागरिकांनी संत तुकाराम महाराज पालखी वारकरी बांधवांना अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परिसरातील भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमान्य टिळक पुतळा मधुकर पवळे उड्डाण पूल खाली निगडी येथे जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा तसेच अल्पोपहाराचा लाभ घेण्याचे आवाहन संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अन्नदान कार्यक्रम अध्यक्ष योगेश बोंडे, अभिजित पुरी, राजेंद्र लक्ष्मण काळभोर, अनिकेत काळभोर, सचिन काळभोर, रफिक शेख शाकीर, शेख राजू, शेख हैदर, भाई शेख, पप्पू दासानी, पप्पू हतागळे, समाधान मगर, महेश मगर, वृषाली पाटणे बचतगट अध्यक्ष निगडी, अर्चना ताई कंद, स्वप्निल पवार, विनय ठवकर, बबनराव महाराज दळवी-भोसले, रोहिदास शिवणेकर, किशोरभाऊ गाथाडे आदींनी नागरिकांना आवाहन केले आहे.

सुमारे एक हजार वारकरी बांधवांना खिचडी, चहा नाश्ता पाणी बॉटलची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आषाढी वारी परतीच्या शेवटच्या टप्प्यात संत तुकाराम महाराज पालखी निगडी भक्ती शक्ती उड्डाण पूल खाली मार्गानं जाणारं असून वारकरी बांधवांना खिचडी चहा नाश्ता पाणी बॉटल व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *