तांदळाचे भाव कमी होणार ? सरकारने बनवली जबरदस्त योजना; उचलू शकतात ‘हे’ मोठे पाऊल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । भारत तांदळाच्या बहुतांश निर्यातीवर बंदी घालण्याच्या विचारात आहे. भारत सरकारच्या या पावलामुळे जागतिक बाजारात तांदळाच्या किमती आणखी वाढू शकतात. तसेच भारतात किमतीत कपात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे अल निनोमुळे तांदळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तांदळाच्या किमती ११ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. स्थानिक पातळीवर तांदळाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी भारताकडून हे पाऊल उचलले जाऊ शकते. देशातील अनेक भागात तांदळाच्या किमती २० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या प्रकरणाशी संबंधित तज्ज्ञांच्या मते, सरकार सर्व गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या योजनेवर चर्चा करीत आहे. सरकारला विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी देशात महागाईचा धोका टाळायचा आहे. त्यामुळे बिगर बासमती जातीच्या तांदळावर बंदी घालण्याचा विचार आहे, असंही अहवालात म्हटले आहे.

भारतात तांदळाच्या किमती वाढत्या
विशेष म्हणजे जगातील एकूण निर्यातीत भारताचा वाटा ४० टक्के आहे. याबरोबरच जगातील सर्वात स्वस्त तांदूळही भारतातून निर्यात केला जातो. भारताने स्वस्त तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली तर जगात तांदळाच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते. दुसरीकडे भारतीय तांदळाच्या निर्यात किमतीत ९ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. गेल्या महिन्यातच सरकारने तांदळाच्या एमएसपीमध्ये ७ टक्क्यांनी वाढ केली होती.

पेरणीत २६ टक्के घट झाली
उन्हाळी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाऊस कमी पडल्याने देशभरात पेरण्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. जर आपणाला गेल्या आठवड्याच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास भाताची उन्हाळ्यात पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत २६ टक्के कमी आहे. याचे ताजे कारण म्हणजे एल निनो असल्याचे सांगितले जाते. ज्याचा परिणाम केवळ भारतातच नाही तर थायलंडमध्येही दिसून येत आहे, जिथे सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्यामुळे एकच पीक घेण्यास सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *