महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मराठवाडा विशेषप्रतिनिधी: आकाश शेळके – दिनांक 15 जून 2020 रोजी फार्मसी कृती समिती महाराष्ट्र तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर एक राज्यव्यापी आंदोलन सोशल मीडिया मार्फत घेण्यात आले . या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील फार्मसी विभागाच्या हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून राज्यपाल यांचा जाहीर निषेध केलेला आहे.
महोदय आमच्या फार्मसी कृती समिती महाराष्ट्र तर्फे दिनांक ०८ जून 2020 रोजी माननीय भगतसिंग कोश्यारी साहेब राज्यपाल महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले होते, निवेदन असे होते की अंतिम वर्षाच्या परीक्षा व ATKT विद्यार्थ्यांच्या परीक्षा दिनांक 15 जून 2020 पर्यंत रद्द न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या निवेदनाची मुदत संपुष्टात आलेली असताना देखील माननीय राज्यपाल कार्यालयाकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे
आज दिनांक 15 जून 2020 रोजी सकाळी ९ वाजेपासून ते ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या घरामध्ये राहून सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून आपल्याच घरांमध्ये ५ मिनिटे उभे राहून हातावर काळी रिबीन बांधून तोंडाला मास्क लावून सोशल डिस्टंसिंग चे पालन करून हातामध्ये पांढरे फलक घेऊन त्यावर ती राज्यपालांच्या विरोधात काही घोषवाक्य लिहून फार्मसी कृती समितीतर्फे देण्यात आलेल्या #परीक्षा रद्द झाल्याच पाहिजे याचा उपयोग करून निषेध नोंदवण्यात आला आहे.