महामार्गाच्या कामांमुळे पाणी अडून शेतीचे नुकसान.मा. खा.हेमंत पाटील यांनी केली पहाणी..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मराठवाडा विशेषप्रतिनिधी: संजीवकुमार गायकवाड – हिंगोली*: वसमत तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे कोर्टा आणि चोंडी गावाजवळ पावसाचे पाणी अडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हजारो हेक्टर वरील सोयाबीन हळद पिकाचे नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मा.खा. हेमंत पाटील यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडे केली आहे व हिंगोली जिल्हाधिकार्या्ना या भागातील पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.यावेळी कुरूंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपीनवार, मंडळ अधिकारी , तलाठी यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थिती होते .

मागील तीन दिवसापासून राज्यात मान्सून चे आगमन झाले आहे जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून काही भागात पेरणी सुद्धा झाली आहे . हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात सुद्धा शेतकऱ्यानी खरीपाची सोयाबीन व हळद पिकाची पेरणी केली होती. पण तालुक्यातील चोंडी व कोर्टा या भागातून राष्ट्रीय महामार्ग जात आहे यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या काम सुरु आहे.यामुळे काही ठिकाणी पुलाच्या कामामुळे पावसाचे पाणी अडून हजारो हेक्टर वर शेतकरयांनी पेरणी केलेले सोयाबीन, कापूस , हळद पीक वाहून गेले आहे पहिल्याच्या पावसात रस्त्याच्या अर्धवट राहिलेलया कामामुळे पाणी अडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पिकासोबतच महामार्गालगत सुपीक जमीन वाहून गेली आहे

त्यामुळे जमिनीचा पोत बिघडून पिकांचे नुकसान झाले आहे तर काही भागात पाणी साचल्याने गाळ अडकून सुद्धा पिकांचे नुकसान झाले आहे याबाबत मा.खासदार हेमंत पाटील यांनी चोंडी व कोर्टा भागाचा दौरा करून पाहणी केली . व नुकसान झालेल्या शेतकऱ्याना तातडीने भरपाई देऊन दुबार पेरणीचे संकट दूर करावे अशी मागणी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडे केली आहे. तसेच हिंगोली जिल्हाधिकऱ्याना या भागाचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपाययोजना करावी असे निर्देश दिले आहेत आहेत.महामार्गाच्या प्रलंबित राहिलेल्या कामामुळे येत असलेल्या अडचणींचा पाढाचं यावेळी उपस्थित शेतकरी बांधवानी मा.खा. हेमंत पाटील यांच्या समोर समस्या वाचून दाखविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *