महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असून मुंबईमधील ब्रीच क्रँडी रूग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडणार आहे. शरद पवारही रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती समजत आहे.
Maharashtra | NCP chief Sharad Pawar's wife Pratibha Pawar admitted to Mumbai's Breach Candy Hospital: She will undergo surgery at Breach Candy Hospital, NCP President Sharad Pawar has reached the hospital: NCP
— ANI (@ANI) July 14, 2023
प्रतिभा पवार यांच्यावर कोणती शस्त्रक्रिया होत आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शरद पवार यांनी पहिल्यांदा राष्ट्रावादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं होतं तेव्हा शरद पवारांसोबत त्या हॉलमध्ये प्रतिभा पवारही उपस्थित होत्या.