“राहुल नार्वेकर आपण कितीही टंगळमंगळ केली तरीही…”, संजय राऊत यांची टीका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । राहुल नार्वेकर हे वकील आहेत. मात्र ते ज्या पक्षात ते आहेत तो पक्ष कायदा, नीतीमत्ता या गोष्टी मानत नाही हे तुम्हाला माहित आहे. मात्र राहुल नार्वेकरांना अनेक पक्षांचा अनुभव असल्याने त्यांना कायदा माहित आहे. आपण शिवसेनेचेही वकील होता. सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं आहे तेही तुम्हाला माहित आहे. राहुल नार्वेकर तुम्ही कितीही टंगळमंगळ केली तरीही तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल असं आता संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

१६ आमदार अपात्र ठरणारच
१६ आमदार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १०० टक्के अपात्र ठरणार. तु्म्ही कितीही वाचवायचा प्रयत्न केलात, प्राणवायू लावलात, इंजेक्शनं दिली तरीही ते जाणार आणि जाणारच. महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेचं कौतुक
राज ठाकरेंनी कुणाही बरोबर न जाण्याची भूमिका आत्ता घेतली आहे ती योग्य आहे. माणूस सगळ्यांबरोबर काम करुन शेवटी एक भूमिका घेतो. त्यांनी काय करायचं यावर मी बोलणं योग्य नाही असंही संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांचे भाऊ आहेत. त्यांना एकत्र यायचं असेल तर त्यासाठी कुठल्याही मध्यस्थीची गरज नाही. ते दोघंही एकमेकांना फोन करुन हा निर्णय घेऊ शकतात. मी स्वतः राज ठाकरेंना फोन करु शकतो.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही
मी राजकारणात नव्हतो तेव्हापासून माझी आणि राज ठाकरेंची मैत्री आहे. राजकारणात उद्या काय घडेल माहित नाही. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? हे काळ ठरवेल. अजित पवार, छगन भुजबळ हसन मुश्रीफ हे सगळे भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे राजकारणात काहीही घडू शकतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *