Rahul Kalate: राहुल कलाटे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. चिंचवडचे राहुल कलाटे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या आमदारांसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामिल होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पिंपरी चिंचवडच्या चार माजी नगरसेवकांसह राहुल कलाटे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

बंडाच्या एक वर्षानंतरही ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ काही कमी होण्याचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या मनीषा कायंदे, निलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केला. मनीषी कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर विश्वास दाखवत एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारीही सोपवली. त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. राहुल कनाल यांनीही शिंदे गटात प्रवेश करताच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचेच निकटवर्तीय आणि माजी नगरसेवक अमेय घोले यांनीही नाराजी व्यक्त करत शिंदे गटाची वाट धरली होती

कोण आहेत राहुल कलाटे?
कलाटे कुटुंबीय 2001 पूर्वी काँग्रेसमध्ये होते. 2002 साली राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर महापालिका निवडणुकीत पराभूत झाले. 2014 च्या विधानसभेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढली, दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली.2017 पहिल्यांदा शिवसेनकडून नगरसेवक झाले. पालिकेत शिवसेनेचे गटनेते, तसेच शहराध्यक्ष होते. 2019 विधानसभेवळी युती असताना बंडखोरी केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अन वंचितचा पाठिंबा मिळाला. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांविरोधात निवडणूक लढली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीवेळी मविआमधून बंडखोरी केली. मात्र यावेळी कलाटे यांचे डिपॉझिट जप्त झाले. तेव्हापासून वेट ऍण्ड वॉच च्या भूमिकेत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *