महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पि. के. महाजन – पिंपरी चिंचवड – चीनी मालाचा भारतीय अर्थव्यवस्थे वर खुप मोठा परीणाम होतो. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दराचा अपेक्षीत टप्पा गाठता येत नाही. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार आपण चिनी मालावर आपण बंदी घालू शकत नाहीत. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार आपली चूक होऊ नये म्हणून आपण आपलं नुकसान सहन करून घेत आहोत. चिनलाा भारतीय मार्केट खुलं असुन सुद्धा चिन सतत भारतावर कुरापती काढत आहे. आपला आर्थिक विकास चीनच्या डोळ्यात खूपत आहे म्हणून भारत व चीनच्या नियंत्रण रेषेवर जवानांच्या चकमकीत नुकतेच आपले दोन जवान व एक अधीकारी शहीद झालेत. त्या मुळे चिनला तत्काळ धडा शिकवावा म्हणून चिनी मालावर बहिष्कार घालावा अशा तीव्र भावना राष्ट्रीय स्तरावर होत आहे त्यात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन जी यांचाही समावेश आहे.
परंतु प्रत्यक्षात चिनी मालावर बहिष्कार घालायचा निर्णय घेतला तरी तो यशस्वी होईल की नाही शंका आहे कारण चिनी वस्तू भारतीय वस्तूं पेक्षा खुपच स्वत भेटतात..त्या मुळे आपल्यापुढे मला दोनच योग्य पर्याय दिसतात 1) चिनी वस्तूंवर आयात शुल्क वाढवून चिनी वस्तू स्वदेशी वस्तूंपेक्षा महाग करने किंवा चिनी वस्तूंच्या किमती स्वदेशी वस्तूंच्या किमती बरोबर आणुन ठेवने जेणेकरून करून जनता स्वदेशी च वस्तू खरेदी करतील. 2) जनतेने देशाच्या सवाभीमानासाठी आर्थीक भार सहन करून स्वदेशी वस्तू खरेदी करुन चिनी मालावर बहिष्कार घालावा…. हेच दोन योग्य पर्याय आपल्याकडे आहेत एक जनतेच्या हातात व दुसरा केंद्र सरकारच्या मनात, असे दिसते. मध्यंतरी सरकारने आयात शुल्क वाढवले परंतु त्या पेक्षा ही जास्त जास्तीतजास्त आयात शुल्क वाढविणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय नियमांच्या अधीन राहून देशाच्या व जनतेच्या हितासाठी योग्य तो निर्णय केंद्व सरकार घेणे आवश्यक आहे…………