“किरीट सोमय्या कुटुंबाच्या नजरेतून उतरले”, VIDEO लीक प्रकरणी ठाकरे गटाच्या आमदाराची तिखट प्रतिक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओंमध्ये दिसणारी व्यक्ती अश्लील कृत्य करताना दिसत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ प्रसारीत केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरून आता विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार टीकास्र सोडलं.

सध्या किरीट सोमय्या यांची घरची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. ते मुलाच्या आणि कुटुंबाच्या नजरेतून उतरले आहेत. किरीट सोमय्या माझे वडील आहेत, असं सांगायची हिंमतही त्यांच्या मुलांमध्ये नाही, अशी टीका नितीन देशमुख यांनी केली. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

किरीट सोमय्या व्हिडीओ लीक प्रकरणी प्रतिक्रिया देताना नितीन देशमुख म्हणाले, “किरीट सोमय्यांची परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. तो एक नालायक आणि पिसाळलेला माणूस आहे. किरीट सोमय्यांनी अनेकांच्या मागे ईडीची चौकशी लावली. आमच्यामागेही ‘अँटी करप्शन’ विभागाची चौकशी लावली. पण आम्ही जेव्हा चौकशीला जायचो, तेव्हा आमच्या कुटुंबाने आणि आमच्या पत्नीने टिळा लावून आमचं स्वागत केलं. त्यानंतर आम्ही चौकशीला हजर राहिलो.”

“पण आजची किरीट सोमय्यांची घरची परिस्थिती वेगळी आहे. किरीट सोमय्या हे माझे वडील आहेत, असं सांगण्याची हिंमत त्यांची मुलं करत नाहीयेत. असं कृत्य किरीट सोमय्यांनी केलं आहे. ते आपल्या कुटुंबाच्या आणि मुलाच्या नजरेतून उतरले आहेत. एवढं नीच कृत्य त्यांनी केलं आहे,” अशी तिखट प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *