महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै ।
चिपळूण-कराड मार्ग वाहतूकीसाठी बंद
चिपळूण-कराड मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई – नाशिक महामार्गावर शहापूर ते आसनगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत. नाशिक वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेन मध्ये खड्ड्यामध्ये एक गाडी आदळून बंद पडली. त्यामुळे रस्ता ब्लॉक झाला आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेंनवर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत; पॉईंट फेल झाल्याने रेल्वे वाहतूक ठप्प
हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पॉईंट फेल झाल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. पनवेल ते बेलापुर दरम्यान लोकल वाहतूक ठप्प झाली आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी
रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. IMD ने आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘रेड’ अलर्ट तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे.
साताऱ्यातील अंबेनळी घाटात दरड कोसळली, वाहतूक पूर्ण बंद
साताऱ्याच्या अंबेनळी घाटातील चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळली आहे. काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे ही दरड कोसळली आहे. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आला आहे.