Rain : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै ।राज्याच्या अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी (Heavy rain) लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये (Farmers) आनंदाचं वातावरण आहे.राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर. झाडेगाव गावात अनेकांच्या घरात शिरल पाणी

जळगाव जामोद तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जळगाव जामोद नांदुरा मार्गावरील झाडेगाव नजिक असलेल्या नाल्याला मोठा पूर आल्याने पुलावरून पाणी असल्याने नांदुरा – जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्ग ठप्प

तब्बल दीड महिना परभणी जिल्हा कोरडा राहिल्यानंतर मागच्या तीन दिवसांपासून परभणी जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावलीय.

मुसळधार पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

गेल्या चार दिवसापासून रायगडला अक्षरशः पावसाने झुडपलेला आहे त्यातच आज हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला असून रायगड जिल्ह्यातील चार नद्या इशारा पातळी वर वाहतात

चिपळूण शहरातील वाहणारे वशिष्ठी नदीचे पाणी नदी पात्र बाहेर येऊन काही सखल भागामध्ये शिरले आहे.

रत्नागिरी- खेड मधील जगबुडी नदीला पूर आला आहे. खेड शहरात शिरलं जगबुडी नदीचे पाणी

बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलंआहे.

पुण्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सलग दिवशी विक्रमी पाऊस कोसळला आहे. गेल्या 24 तासांत इथं तब्बल 220 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर 48 तासांत तब्बल 434 मिमी पाऊस कोसळला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *