महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी बुधवारी सायंकाळी वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार, स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात 30 ऑगस्ट रोजी मुलतान येथे खेळला जाईल. तर 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी येथे भारत- पाकिस्तान सामना रंगणार आहे. तर 17 सप्टेंबर रोजी कोलंबो येथील मैदानावर फायनल होणार आहे.
हायब्रीड मॉडेलवर आयोजन, 6 संघ सहभागी होणार
ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजेच, स्पर्धेतील पहिले चार सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील, तर अंतिम सामन्यासह उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. स्पर्धेत 6 संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेतील 6 संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटातील अव्वल 2-2 संघ सुपर-4 टप्प्यात जातील. पुढे, दोन्ही गटांचे संघ गुणांमध्ये पहा.
गट-अ: भारत, नेपाळ आणि पाकिस्तान.
गट-ब: श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान.
दुपारी दीड वाजता मॅचला सुरूवात
आशिया चषक स्पर्धेतील सर्व सामने दिवस-रात्र असणार आहेत. पाकिस्तानमधील सर्व सामने दुपारी 1:00 वाजता (भारतीय वेळेनुसार 1:30 वाजता) सुरू होतील. श्रीलंकेतील सर्व सामने दुपारी दीड वाजल्यापासून खेळवले जातील. भारत आणि श्रीलंकेची वेळ समान आहे.
आशिया चषक 31 ऑगस्टपासून सुरू होणार होता, आता 30 पासून
एकदिवसीय आशिया चषक यापूर्वी 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत खेळवला जाणार होता, परंतु उद्घाटन बदलण्यात आले आहे. आता उद्घाटनाचा सामना मुलतानमध्ये 30 ऑगस्टला होणार आहे.