ENG vs AUS 4th Test: मार्क वुडच्या धारदार गोलंदाजीसमोर स्टीव्ह स्मिथची रणनीती ठरली फेल, पाहा VIDEO

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । Mark Wood dismissing Steve Smith LBW video goes viral: ॲशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना १९ जुलैपासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळवला जात आहे. सलग दोन पराभवानंतर पुनरागमन करत यजमान इंग्लंडने शेवटचा कसोटी सामना तीन गडी राखून जिंकला. इंग्लंडच्या या विजयाचा हिरो मार्क वुड ठरला होता. मँचेस्टर कसोटी सामन्यातही मार्क वुड जबरदस्त प्रदर्शन करताना दिसत आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्क वुडने स्टीव्ह स्मिथला आपला बळी बनवत इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी –
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पाचव्या षटकात धक्का बसला. जेव्हा सलामीवीर उस्मान ख्वाजा (१२ धावा) स्टुअर्ट ब्रॉडचा बळी ठरला. डेव्हिड वॉर्नर आक्रमक खेळी खेळताना दिसला, मात्र ३८ चेंडूत ३२ धावा करून ख्रिस वोक्सने त्याला बाद केले. त्यानंतर मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यातील भागीदारी बहरत असल्याचे दिसून आले होते.

स्टीव्ह स्मिथ मँचेस्टरमध्ये मोठी खेळी खेळताना दिसला पण मार्क वुडमुळे त्याच्या आशा धुळीस मिळाल्या. डावाच्या ३०व्या षटकात स्टीव्ह स्मिथ ५२ चेंडूत ४१ धावांची खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्क वुडने एक वेगवान चेंडू टाकला जो अँगलसह आत आला, ज्याचा स्टीव्ह स्मिथला बचाव करायचा होता, पण तो चेंडू त्याच्या पॅडवर आदळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *