मानवतेला काळीमा फासणारी घटना ; मणिपूरमध्‍ये दोन महिलांची विवस्‍त्र धिंड, सामूहिक अत्याचार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । मागील दोन महिन्‍यांपासून अधिक काळ हिंसाचारात होरपळणार्‍या मणिपूर राज्‍यात संतापजनक आणि मानवतेला अत्‍यंत लाजिरवाणी करणारी घटना समोर आली आहे. राज्‍यात एक व्‍हिडिओ व्‍हायरल झाला असून त्‍यामुळे दोन महिलांची विवस्‍त्र धिंड काढल्‍याचे दिसते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. विकृत प्रवृत्तीवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ( Manipur Horror )

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे लोक संतप्त झाले असून प्रशासनाकडून कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. दोन महिलांवर शेतात सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप एका आदिवासी संघटनेने केला आहे.
या प्रकरणी पोलिस अधीक्षक के मेघचंद्र सिंह यांनी सांगितले की, “व्‍हायरल होत असलेला व्हिडिओ ४ मे रोजीचा आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून या संदर्भात अज्ञात चोरट्यांविरुद्ध अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खून इत्यादींचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.”

मुख्‍य आरोपीला अटक
या प्रकरणातील एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. खुयरुम हेरदास असे आरोपीचे नाव आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तो हिरवा शर्ट घातलेला दिसत आहे. व्हिडिओवरून त्याची ओळख पटली आहे.पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत कांगपोकपी जिल्ह्यातील घटनेची तारीख 4 मे असल्याचे नमूद केले आहे. तथापि, 21 जून रोजी थौबल जिल्ह्यात एफआयआर दाखल करण्यात आला. अज्ञात लोकांविरुद्ध अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *