महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । अखेर सुजित पाटकर यांना ईडीनं बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे. थोड्या वेळात त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सुजित पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचं मानलं जातं.
सुजित पाटकर यांच्यावर मुंबई महापालिकेतील कोव्हीड सेंटरमध्ये घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू होती. अखेर सुजित पाटकर यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्यासह आणखी दोघांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे.