Heavy Rainfall : पिंपरी चिंचवडमध्ये पिंपळे सौदागर परिसरात सोसायटीजवळ रस्ता खचला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । राज्यात मुसळधार पावसानं अक्षरश: थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये सखल भागांत मोठ्या प्रमाणत पाणी साचलं आहे. मुसळधार पावसानं वाहतुकीचे तीन तेरा झाले आहेत. नागरिकांची दाणादाण उडाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरातील उच्चभृ सोसायटी समोरील रस्ता खचल्याची घटना समोर आली आहे. सोसायटीना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन तुटल्या, रहदारीला मोठी अडचण रस्ता खचल्याने निर्माण झाली आहे. प्लॅनेट मिलेनियम सोसायटी समोर ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *