पोटाच्या समस्येने हैराण आहात ? जाणून घ्या झटपट आराम मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । बऱ्याच वेळा खराब जीवनशैलीमुळे किंवा तेलकट, तळलेले आणि शिळे अन्न खाल्ल्याने गॅस्ट्रिकचा त्रास सुरू होतो. गॅस, अॅसिडीटी, छातीत जळजळ, अपचन आणि तीव्र पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. कधी-कधी प्रवास, गर्भधारणा, दुग्धजन्य पदार्थांचा अतिवापर, ताणतणाव आणि आहारात फायबरची कमतरता यांमुळेही पोटात गॅसचा त्रास होऊ शकतो. गॅस ही गंभीर समस्या नाही. मात्र, त्याचा त्रास दुसऱ्यांदेखील होतो. गॅस्ट्रिक समस्या घरगुती उपायांचा अवलंब केल्याने तुम्ही यापासून त्वरित आराम मिळवू शकता.


पोटात गॅस होण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कोमट पाणी
कोमट पाण्याने पचनक्रिया चांगली राहते. अपचनामुळे होणाऱ्या पोटदुखीपासूनही आराम मिळतो. गॅस्ट्रिकचा त्रास जास्त असल्यास गरम पाण्यात ओवा किंवा जिरे टाकून प्यायल्याने आराम मिळतो.

काळी मिरी
आयुर्वेदात काळी मिरी जठरासंबंधी समस्या दूर करण्यासाठी गुणकारी मानली जाते. काळी मिरी इतर अनेक समस्यांवर प्रभावी उपाय मानली जाते. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा गॅस किंवा अपचन सारख्या समस्या उद्भवतात, तेव्हा काळी मिरी खाल्ल्याने या समस्या दूर होतात.

बडीशेप
गॅस्ट्रिकच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठीही बडीशेप खूप उपयुक्त आहे. तसेच तोंडाची चवही खराब होऊ देत नाही. याच्या वापराने गॅस्ट्रिक आणि अॅसिड रिफ्लक्स सारख्या समस्या दूर होतात.

आले
आल्याचा रस कोमट पाण्यात आणि साखर मिसळून सेवन करा. आयुर्वेदात पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हे गुणकारी मानले जाते. आल्याबरोबरचा काळा चहा देखील गॅस्ट्रिकच्या समस्यांमध्ये त्वरित आराम देतो.

लिंबू
लिंबूचे सेवन गॅस्ट्रिक, अपचन, हार्ट बर्न यासारख्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी असल्याचे अनेक संशोधनांमध्ये आढळून आले आहे. लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनक्रिया सुधारते. सकाळी याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.

ओवा
ओवा झटक्यात जठरासंबंधी समस्या दूर करू शकते. अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा मीठ एकत्र सेवन केल्याने गॅस्ट्रिकचा त्रास दूर होतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *