Sara Ali Khan : कपाळावर भस्म, हातात काठी, लाल चुनरी; सारा अली खान अमरनाथ यात्रेत सहभागी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या चर्चेत आहे. सारा अनेकदा मंदिर, मशिदी, गुरुद्वार अशा धार्मिक स्थळांना भेटी देत असते. सारा आता थेट अमरनाथ यात्रेत (Amarnath Yatra) सहभागी झाली आहे. अमरनाथ यात्रेदरम्यानचा व्हिडीओ साराने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

साराची अमरनाथवारी…
सारा अली खानने सोशल मीडियावर अमरनाथ यात्रेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये साराने तिच्या संपूर्ण अमरनाथ यात्रेची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये ती अनेक लोकांसोबत चालताना दिसत आहे. तसेच ‘हर हर महादेव’च्या जयघोषात ती अमरनाथ यात्रा पूर्ण करत आहे.

 

कपाळावर भस्म, हातात काठी, गळ्यात लाल रंगाची चुनरी असा काहीसा साराचा लूक आहे. अमरनाथ यात्रेतील साराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच साराच्या अमरनाथवारीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. व्हिडीओमध्ये साराने अमरनाथच्या गुहेबाहेरील भाविकांची झलकही दाखवली आहे.


सारा अली खानला करावा लागला ट्रोलिंगचा सामना
सारा अली खानचा ‘जरा हटके जरा बचके’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान ती हिंदू मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होती. त्यावेळी अनेकांनी तिला ट्रोल केलं. तू मुस्लिम आहेस आणि हिंदू मंदिरांमध्ये काय करतेस? अशी टिका केली. पण त्यानंतरही सारा माझी श्रद्धा आहे. त्यामुळे मी हिंदू मंदिरांमध्ये जात राहणार असं म्हणत मंदिरात जात राहिली आहे.

‘केदारनाथ’ या सिनेमाच्या माध्यमातून सारा अली खानने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. तिचा पहिलाच सिनेमा गाजला. या सिनेमामुळे सारा लोकप्रिय झाली. काही दिवसांपूर्वी विकी कौशल सोबत ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमात ती दिसली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता ‘मेट्रो इन दिनो’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त आहे. साराच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *