महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । West Indies announce squad for India ODI series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली, मात्र टीम इंडियाने मालिका 1-0 ने जिंकली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 27 जुलै रोजी होणार आहे.
वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा आधीच झाली आहे. एकदिवसीय मालिकेत चांगल्या कामगिरीवर रोहित सेनेची नजर असेल. एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे. आता वेस्ट इंडिजने एकदिवसीय मालिकेसाठी त्यांचा संघ जाहीर केला आहे. (India vs West Indies ODI Series)
या खेळाडूंचे पुनरागमन
क्रिकेट वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी वेस्ट इंडिजने खेळाडूंसाठी एक शिबिर आयोजित केले होते, त्यापैकी 15 खेळाडूंची वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. निवडकर्त्यांनी सर्वोत्तम फलंदाज शिमरॉन हेटमायर आणि वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस यांना माघारी बोलावले आहे तर पूरण आणि होल्डर यांचा पत्ता कट झाला आहे.
त्याचवेळी दुखापतीतून बरे होऊन संघात पुनरागमन करणारे तीन खेळाडू आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज जेडेन सील्स, लेगस्पिनर यानिक कारिया आणि फिरकी गोलंदाज गुडाकेश मोती यांचा समावेश आहे. हे तिन्ही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त आहेत.
एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ:
शाई होप (कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उप-कर्णधार), अॅलिक अथानाज, यानिक कॅरिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक :
पहिली वनडे – 27 जुलै; केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस
दुसरी वनडे – 29 जुलै; केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस
तिसरा एकदिवसीय – 15 ऑगस्ट; ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद