महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । July 25th Day in History : आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. आज म्हणजे 25 जुलै रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या . आजच्या दिवशी जगातील पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म झाला होता.
इतिहासात 25 जुलै या तारखेला विज्ञानाच्या एका महान आणि ऐतिहासिक कामगिरीची नोंद आहे. 25 जुलै 1978 रोजी आजच्याच दिवशी जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस ब्राउनचा जन्म झाला होता. इंग्लडंच्या ओल्डहॅम जनरल हॉस्पिटलमध्ये पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला होता. त्यावेळी या मुलीला ‘बेबी ऑफ द सेंच्युरी’ असा खिताब देण्यात आला होता. अलीकडच्या काळात भारतामध्येही ‘टेस्ट ट्यूब बेबीची’ संकल्पना रुजू लागली आहे. ‘टेस्ट ट्यूब’ प्रणालीने बाळ जन्माला घालणं ही विज्ञानातील खूप मोठी प्रगती म्हणावी लागेल. प्रत्येकवर्षी IVF तंत्रज्ञानाद्वारे जन्मलेल्या लुईस जॉय ब्राउन यांचा 25 जुलै हा दिवस वर्ल्ड एंब्रियोलॉजिस्ट डे म्हणून साजरा केला जातो.