IRCTC Down! भारतीय रेल्वेची ऑनलाईन ई- तिकीट यंत्रणा कोलमडली ; हाल सर्वसामान्य प्रवाशांचे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । तुम्हीही IRCTC वरून तिकीट बुक करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. IRCTC सर्व्हर डाउन झाले असून IRCTC ने ट्विट करून ही माहिती लोकांना दिली आहे. कंपनीने म्हटले की मेंटेनन्स ॲक्टिव्हिटीमुळे तिकिटांचे बुकिंग होऊ शकत नाहीये. कंपनीने म्हटले की त्यांची तांत्रिक टीम अडचण दूर करण्यासाठी काम करत असून लवकरच तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जाईल.

आयआरसीटीसीने ट्विट केले की तांत्रिक समस्या फक्त ॲप आणि वेबसाइटवर येत आहे. तथापि, बुकिंगसाठी तुम्ही आस्क दिशा पर्याय निवडू शकता. तसेच, तुमच्या IRCTC ई-वॉलेटमध्ये पैसे असल्यास तिथूनही तिकिटे बुक करता येतील. तर शक्य असल्यास तुम्ही रेल्वे स्टेशनवरील काउंटरवरून तिकीट बुक करू शकता. IRCTC च्या प्रवक्त्याने सांगितले की, काल रात्रीपासून साइट बंद असून ती कार्यान्वित करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या रेल्वेच्या एकूण आरक्षित तिकिटांच्या बुकिंगमध्ये IRCTC चा वाटा ८०% हून अधिक असताना IRCTC ॲप आणि साइट स्टॉल झाल्यामुळे वापरकर्त्यांना अडचणीला सामोरे जावे लागे आहेत.

त्याचे पैसे किती दिवसात परत दिले जातील असेही त्यांनी म्हटले. काही वापरकर्त्यांना अयशस्वी व्यवहार सूची लॉगमध्ये नवीन एंट्री देखील दिसत नाही, त्यामुळे त्यांच्या पैशाचे काय झाले, हे कळू शकलेले नाही. अशा लोकांना त्यांचे तिकीट बुक केले आहे की नाही किंवा व्यवहार कुठे अडकला आहे हे देखील समजू शकत नाही. दरम्यान, सध्याच्या माहितीनुसार १० तासांपेक्षा जास्त काळ तिकीट बुकिंग होत नाहीये, त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत असून तक्रारींचा फेरा सुरू आहे.

तसेच ‘आस्क दिशा’वरही अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी ट्विटरवर केल्या आहेत आणि पैसे खात्यातून वजा होऊनही तिकीट बुक होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणेणे आहे. यासंदर्भात अनेक प्रवाशांनी त्यांचे पैसे कापले गेल्याचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत, मात्र तिकीट बुक केले जात नाही.

रेल्वेचे तिकीट बुकिंग कुठून कराल!
दरम्यान, जर तुम्ही IRCTC वर ऑनलाईन तिकीट बुक करू शकत नसाल तर घाबरण्याचे कारण नाही. बुकिंगसाठी तुम्ही ‘आस्क दिशा’ पर्याय निवडू शकता. याशिवाय तुमच्या IRCTC ई-वॉलेटमध्ये पैसे असतील तर तिथून तिकीट बुकिंगही करता येईल. तसेच तुम्ही रेल्वे स्टेशनवरील काउंटरवरून तिकीट बुक करू शकता. आयआरसीटीसीने म्हटले की, पर्यायाने ॲमेझॉन, Makemytrip इत्यादी सारख्या B2C प्लॅटफॉर्मवरून तिकिटे बुक करता येऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *