Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
INDIA च्या संयोजन पदाच्या शर्यतीत ‘या’ नेत्याच नाव आघाडीवर, सर्वेचा चक्रावणारा कौल - Maharashtra 24

INDIA च्या संयोजन पदाच्या शर्यतीत ‘या’ नेत्याच नाव आघाडीवर, सर्वेचा चक्रावणारा कौल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडिया’ नावाची आघाडी स्थापन केली आहे. ‘इंडिया’ च संयोजक कोण असणार? या प्रश्नाच अजूनही उत्तर मिळालेलं नाहीय. संयोजकाच्या नावावर अजून शिक्तामोर्तब झालेलं नाही. विरोधी पक्षांच्या या आघाडीच्या संयोजक पदासाठी नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी आणि अन्य नेत्यांची नाव चर्चेत आहेत. चर्चेत असलेल्या नावांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? या विषयी अजून स्पष्टता नाहीय.

विरोधी पक्ष आघाडीचा चेहरा कोण?
विरोधी पक्षांच्या आघाडीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. एक बैठक पाटण्यात दुसरी बंगळुरुमध्ये झाली. बंगळुरुच्या बैठकीत आघाडीला INDIA हे नाव देण्यात आलं. या आघाडीत एकूण 26 पक्ष आहेत. सी वोटरने एक सर्वे केला. या सर्वेत संयुक्त विरोधी पक्ष आघाडीचा चेहरा कोण? या बद्दल प्रश्न विचारण्यात आला. INDIA च संयोजक कोणाला बनवलं पाहिजे? असा प्रश्न विचारण्यात आला.

या नावाला सर्वाधिक पसंती?
33 टक्के लोकांनी माहित नाही असं उत्तर दिलं. 12 टक्के लोकांनी नितीश,. 10 टक्के लोकांनी केजरीवाल, 6 टक्के लोकांनी शरद पवार, 8 टक्के लोकांनी ममता बॅनर्जीच नाव घेतलं. राहुल गांधी यांना या सर्वेत सर्वाधिक 31 टक्के पसंती मिळाली आहे. अशी अपेक्षा कोणीच केली नव्हती. राहुल गांधी नसतील, तर पंतप्रधानपदासाठी कोणाच्या नावावर चर्चा

याआधी दुसऱ्या सर्वेमध्ये लोकांनी विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून राहुल गांधी यांचं नाव सुचवलं होतं. सी वोटरनेच हा सर्वे केला होता. राहुल गांधी नसतील, तर विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदासाठी कोण दावेदार असेल? या प्रश्नावर 33 टक्के लोकांनी प्रियंका गांधी यांचं नाव सुचवलं होतं. 14 टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल आणि तितक्याच लोकांनी नितीश कुमार यांचं नाव सुचवलं होतं. 10 टक्के लोकांनी ममता बॅनर्जी यांचं नाव सुचवलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *