महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आले आहे. नरहरी झिरवळ, महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती आहे. तर शिवसेना आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा आता जोर धरु लागला आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होती अशी चर्चा देखील रंगत आहेत. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवळ यांनी राज्यपालांची वेळ मागितल्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यातील आदिवासी मंत्री आणि अनेक आदिवासी आमदारांसह नरहरी झिरवळ राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. झिरवळ आदिवासी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात राज्यपाल बैस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती, यावेळी राजकीय चर्चा देखील होणार आहे.
शिंदे गटाचे आमदार अपात्रतेबाबत नरहरी झिरवळ यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तेव्हा ते महाविकास आघाडीचे भाग होते. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर झिरवळ अजित पवार गटात सामिल झाले. त्यामुळे ते आता शिंदे-फडणवीस सरकराचा भाग आहेत. यापूर्वी शिंदे गटातील आमदारांविरोधात त्यांची तीव्र भावना होती.
महाराष्ट्राचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी उद्धव ठाकरे गटाचे अजय चौधरी यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून मान्यता दिली होती. याशिवाय सुरेश प्रभू यांची मुख्य व्हीप म्हणून निवड करण्यात आली होती. यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला होता. नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदेंच्या बोलण्याला देखील बगल दिला होता.
जेव्हा एकनाथ शिंदे अन्य आमदारांसह गुवाहाटीला गेले. तेव्हा नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या होत्या. या नोटीसमध्ये या आमदारांना लेखी उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले होते.
त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल सर्वांना नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतर आमदारांचे अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. आता याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार आहेत.