महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर ChatGpt मोबाइल अॅप अखेर अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. iOS व्हर्जनवर लॉन्च झाल्यानंतर हे अॅप दोन महिन्यांनी अँड्रॉइड व्ह्जर्नवर लॉन्च झाले आहे. गेल्या वर्षी ओपनएआय कंपनीने आपला ChatGpt चॅटबॉट लॉन्च केला आहे. तसेच गुगल आणि मायक्रोसॉफ्टने देखील आपले चॅटबॉट लॉन्च केले आहेत.
सॅम ऑल्टमन यांच्या कंपनीने हे अॅप अँड्रॉइड व्हर्जनवर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लॉन्च केले जाईल अशी घोषणा केली होती. विशेष म्हणजे अँड्रॉइड अॅप अशा वेळी आले आहे जेव्हा चॅटजीपीटीच्या ट्रॅफिकमध्ये घसरण आणि तिसादाचा वेळ कमी असल्याच्या बातम्यांशी झगडत आहे. मात्र अॅप लॉन्च झाले असून आता ते तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर रजिस्ट्रेशन करू शकता.
ओपनएआयची येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये अँड्रॉइड अॅपची उपलब्धतेचा विस्तार करण्याची योजना आहे. यादी हे अॅप केवळ iOS युजर्ससाठीच उपलब्ध करून देण्यात आले होते. आता अँड्रॉइडवर देखील हे लॉन्च झाल्यामुळे लाखो अँड्रॉइड युजर्स आता चॅटजीपीटीचा लाभ घेऊ शकणार आहेत. हे अॅप विनामूल्य उपलब्ध असणार आहे.