महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – अजय सिंग – नवीदिल्ली – ता. १९ – लडाखमधील भारत-चीन चकमकीनंतर देशभरात चीनविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी रॅली काढून चिनी वस्तूंचा वापर करू नये, असं आवाहन केलं जात आहे.
त्यातचं एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील एका गावातील आहे. यामध्ये भारत-चीन तणावाबाबत भाजप कार्यकर्त्यांनी चीनविरोधात निषेध रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीमध्ये मात्र एक विचित्र प्रकार समोर आला आहे. चीनविरोधात आयोजित केलेल्या रॅलीमध्ये उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. बहुतेक चीनचे पंतप्रधान कोण, याबाबत भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. ते अख्ख्या रॅलीमध्ये चीनविरोधात घोषणा देत आहेत.
https://twitter.com/LavanyaBallal/status/1273568716110913537
यामध्ये एक भाजप कार्यकर्ता म्हणाला की, आम्ही लडाखमध्ये झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो. त्यासाठी आम्ही रॅलीचं आयोजन केलं आहे. यासाठी चीनचा प्रधानमंत्री किम जोंग उन यांचा पुतळा जाळणार आहोत.