महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी थांबावे ; राज्यमंत्री संजय बनसोडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – जीवन भोसले- लातूर – ता. १९ – वीज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाने वीज वितरणाचे काम वेळेत पुर्ण करावे लोकप्रतिनिधीनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे सर्वांनी मुख्यालय राहावे. कामातला हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशा सूचना राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या . जळकोट येथील तहसील कार्यालयात आयोजित मंडळाचे अधिकारी महसूल , पंचायत ,समिती अधिकारी यांच्या आढावा बैठक दिला या बैठकीसाठी वीज मंडळाचे मुख्य अभियंता आर आर कांबळे प्रभारी अधीक्षक अभियंता रवींद्र नळगीर कर कार्यकारी अभियंता जाधव सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रावण कुमार कार्यकारी उपअभियंता शिवशंकर सावळे उपविभागीय अधिकारी प्रवीण में शेट्टी पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी शेलार पाटील तहसीलदार संदीप कुलकर्णी गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती मनमत किडे उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे प्राध्यापक श्याम ढवळे पंचायत समिती सभापती बालाजी ताकबीड जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके रागाचे जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पाटील दळवे कार्याध्यक्ष गोविंद ब्रह्मंना गजानन दळवे कॉम्रेड किरण पवार सरपंच संघटनेचे अध्यक्ष मेहता बॅग दिलीप कांबळे श्रीनिवास मंगनाळे विठ्ठल चव्हाण नगरसेवक महेश भाऊ शेट्टी माजी सभापती गोविंद माने पाशा शेख दस्तगीर शेख नगरसेवक नरसिंह डांगे विनोद गुरु व विविध खात्यांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी हळद वाढवणा येथील मयत परमेश्वर दही कमळे कपिल दही कांबळे यांचा 11 जून रोजी विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना प्रत्येकी सुमारे चार लाख रुपयांचा धनादेश यावेळी मंत्री संजय बनसोडे वीज मंडळाचे मुख्य अभियंता आर आर कांबळे यांच्या हस्ते देण्यात आला.

बैठकीत बनसोडे म्हणाले की वीज मंडळाच्या बाबतीत खूप मोठ्या तक्रारी आहेत या तालुक्यात सर्व विजेचे तार दुरुस्त करण्यात यावेत डीपी बसविण्यात यावेत प्रत्येक अधिकाऱ्यांनी तू खाली राहावे कार्यकारी अभियंता यांनी महिन्याला एकदा तालुक्याला भेट देऊन बैठक घ्यावी लोकांच्या गरजा समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत मंडळासाठी बजेटसाठी मंत्रालय स्तारवरुन प्रयत्न केले जाणार आहे . तालुक्यातील कुठल्या शेतकऱ्यांची तक्रार येता कामा नये जर कोणी अधिकारी कामात हलगर्जीपणा केला तर त्याची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना अपंग दिव्यांग यांचे सर्व अर्ज निकाली काढावेत असे आदेश तहसीलदार संदीप कुलकर्णी यांना दिले
यावेळी मुख्य अभियंता आर आर कांबळे यांनी सांगितले की प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या अडचणी समजून घ्याव्यात विजेच्या दुरुस्त्या वेळेत पुर्ण कराव्यात दोन सख्ख्या भावांना चा मृत्यू झाला अशा घटना होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
एजन्सी काम करत नसेल तर त्या एजन्सींना ब्लॅक लिस्ट मध्ये टाका. सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यालय राहावे असा त्यांचा घरभाडे भत्ता बंद करावा अशा सूचना कांबळे यांनी दिल्या

जळकोट येथे लवकरच उपविभागीय कार्यालय मंजूर करून त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून दिला आहे 220 केव्ही उपकेंद्र आतून जळकोट कोळनुर वांजरवाडा याठिकाणी पाच पाडव्यापासून विजेचा दाब संतुलित करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. प्रारंभी सरपंच संघटनेचे अध्यक्ष यांनी तालुक्यातील विविध तक्रारी मांडल्या बाजार समितीचे सभापती मनमत किडे यांनी लवकरात लवकर उपविभागीय कार्यालय मंजूर करावे कोळनुर जळकोट वांजरवाडा याठिकाणी पाच पाच दिव्यापासून लोड संतुलित करण्याची मागणी केली यावेळी जि प सदस्य संतोष तिडके बाबुराव जाधव संग्राम पाटील हसुळे आदींनी विविध प्रश्न मांडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *