Rain Update : राज्यात आज कुठे आहे का रेड अलर्ट ; कसा असणार पाऊस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता कमी होणार आहे. राज्यात आता कुठेही रेड अलर्ट दिलेला नाही. यामुळे अतिवृष्टीची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. मात्र राज्यातील काही भागांत ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. मुंबई, पुणेसह काही शहरांची पिण्याची पाण्याची चिंता मिटली आहे.


कसा असणार पाऊस
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह ठाणे, पालघरमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही आता अतिवृष्टी होणार नाही.मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांसाठी यलो अलर्ट आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विदर्भात पावसाचा जोर कमी होणार आहे. पुणे, सातारा आणि घाट परिसरात पाऊस कायम राहणार आहे.

विदर्भात दिलासा
विदर्भात शनिवारी पावसाचा जोर कमी झाला आहे. चंद्रपूर शहरातील नदी लगतच्या भागातल्या परिसरातील पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. वर्धा आणि इरई या नद्यांमुळे शहरातील सखल भागात शिरले होते. ते आता उतरले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गोदावरी आणि प्राणहिता नदीला पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. पहाटेपासून पाण्याच्या वेग कमी झाल्यामुळे जवळपास चार ते पाच फूट पूर ओसरला आहे. मेडिगट्टा धरणातून 14 लाख 44 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 गेट उघडले आहे. यामुळे नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.पश्चिम विदर्भात केवळ 24 तासात 24 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे.

नाशिकमध्ये पाऊस
नाशिकमध्ये रात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या. परंतु सकाळपासून पावसाचा जोर नाही. धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु आहे. धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 68 टक्के भरले आहे. धरणातून 500 क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. भुसावळच्या हतनूर धरणाचे 28 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. हतनूर धरणातून 80 हजार 165 क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे.

45 हजार हेक्टर ऊस पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यातील 45 हजार हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली आला आहे. आठवडाभरापासून ऊस पाण्याखाली असल्याने कूजण्याची भीती आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस शेतीला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *