PM Kisan : अजून खात्यात जमा नाही झाला 14 वा हप्ता, तर या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । प्रतिक्षेनंतर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता (PM Kisan Installment) लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. 27 जुलै रोजी ही रक्कम खात्यात जमा करण्यात आली. देशातील 8 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला. DBT माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरीत करण्यात आली. 8.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 17,000 कोटी रुपयांची धनराशी जमा करण्यात आली. आतापर्यंत एकूण 14 हप्ते जमा करण्यात आले आहे. या माध्यमातून 2.59 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. या योजनेतंर्गत तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर या हेल्पलाईन क्रमांकावर (Helpline Number) कॉल करा.


फेब्रुवारीत यापूर्वीचा हप्ता

यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता जमा करण्यात आला होता. त्यावेळी 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हप्ता जमा करण्यात आला होता. 2.42 लाख कोटी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले होते.

एसएमएस आला का?

केंद्र सरकारने 14 वा हप्ता जमा केला आहे. बँकेकडून खात्यात रक्कम जमा करण्याचा मॅसेज आला असेल. पीएम किसान योजनेतंर्गत हप्ता जमा केल्याचा एसएमएस लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात आला आहे. काही तांत्रिक कारणामुळे मॅसेज चेक करता आला नसेल. तर लाभार्थी जवळच्या एटीएमवर जाऊन बँलेन्स चेक करु शकतो. तो मिनी स्टेटमेंट काढू शकतो. त्यावरुन बँक खात्यात रक्कम झाले की नाही, हे कळेल.

या क्रमांकावर करा कॉल

पीएक किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266

पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401

पीएम किसान हेल्पलाईन : 155261, 18001155266

पीएम किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक : 011-24300606

14व्या हप्त्याबाबत अडचण असल्यास : 011-24300606

या ई-मेलवर करा तक्रार

पीएम किसान योजनेत हप्ता जमा झाला नसेल तर त्याविषयीची चौकशी करा. तुम्ही याविषयीची तक्रार ईमेल आईडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधा. तसेच शेतकऱ्यांना या क्रमांकावर संपर्क करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *