Gold Silver Rate Today : सोने-चांदी दर उतरले ; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । जागतिक बाजारात सोने-चांदीची चढाई सुरु होती. भारतीय सराफा बाजारात मात्र दोन्ही धातू दणकावून आपटली. अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात 0.25 बेसिस पॉईंटची वाढ केली. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी हे पाऊल उचलले. या महिन्यात दोन्ही धातूंनी भारतीय बाजारात आगेकूच केली. 20 जुलैपर्यंत दोन्ही धातूमध्ये तेजीचे सत्र होते. 21 जुलैपासून भावात घसरण झाली. सोन्यात 1000 रुपयांची हजारांची तर चांदीत 2,000 रुपयांची घसरण झाली. आता दोन दिवस सोने-चांदीने (Gold Silver Price Today) पुन्हा उचल खाल्ली होती. सोने 500 रुपयांनी वधारले. तर चांदीने एक हजाराने झेप घेतली. 28 जुलै रोजी सोन्यात जवळपास 400 रुपयांची घसरण झाली. तर चांदीत 2000 रुपयांची पडझड झाली.

21 आणि 22 जुलै रोजी सोन्यात 550 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली.
21 जुलै रोजी सोन्यात 300 रुपये तर 22 जुलै रोजी 250 रुपयांची घसरण झाली.
23 आणि 24 जुलै रोजी भावात मोठा बदल झाला नाही.
25 जुलै रोजी 150 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली.
28 जुलै रोजी जवळपास 400 रुपयांनी दर घसरले.
22 कॅरेट सोने 55,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60260 रुपये प्रति 10 ग्रॅम

गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

चांदीत पडझड
गुडरिटर्न्सनुसार, चांदीमध्ये मोठी पडझड झाली. चांदीच्या किंमतीत 2,000 रुपयांची घसरण झाली. 22 जुलै रोजी सोन्यात 1000 रुपयांची घसरण झाली. तर 24 आणि 25 जुलै रोजी प्रत्येकी 500 रुपयांनी किंमती घसरल्या होत्या. 28 जुलै रोजी 2000 रुपयांनी चांदी स्वस्त झाली.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 59,491 रुपये, 23 कॅरेट 59,253 रुपये, 22 कॅरेट सोने 54,494 रुपये, 18 कॅरेट 44,618 रुपये, 14 कॅरेट सोने 34,802 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,420 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *