महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । मोहरमनिमित्त (Muharram 2023) काढण्यात येणाऱ्या मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ आज (शनिवार) दुपारी तीनच्या सुमारास छत्रपती शिवाजी रस्त्यावरील श्रीनाथ चित्रपटगृहाजवळून करण्यात येणार आहे. यामुळे आज दुपारनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांच वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी केले आहे. (Maharashtra News)
श्री दत्त मंदिर, बेलबाग चौक, बुधवार चौक, जिजामाता चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा चौक, डेंगळे पूल, गाडीतळ चौक, आरटीओ चौकातून संगम पूल येथे मिरवणुकीचे सांगता करण्यात येणार आहे.
लष्कर परिसरातील मिरवणुकीची सुरुवात दुपारी बाराच्या सुमारास ताबूत स्ट्रीट येथून करण्यात येणार आहे. सरबतवाला चौक, बाबाजान दर्गा, भोपळे चौक, महात्मा गांधी रस्ता, कोहिनूर चौक, नाझ हॉटेल चौक, नेहरु मेमोरिअल हॉल, समर्थ पोलीस ठाणे, पॉवर हाऊस चौक, अपोलो चित्रपटगृह, दारुवाला पूल, फडके हौद, मोती चौक, सोन्या मारुती चौक, बेलबाग चौकातून लष्कर भागातील ताबूत मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील.
खडकी भागातील मिरवणूक बोपोडी चौकमार्गे जाणार आहे. दापोडी येथे मिरवणुकीची सांगता करण्यात येणार आहे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. लष्कर भागातील इमामवाडा येथून सकाळी साडेदहाच्या सुमारास मिरवणूक काढण्यात येणार आहे.
ताबूत, पंजे मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. मिरवणूक मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येणार असून मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर रस्ते वाहतुकीस खुले करुन देण्यात येणार आहेत असे वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी सांगितले आहेत.