Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
अखेरच्या क्षणी ITR भरताय? पाहा ऑनलाईन प्रक्रियेची A to Z माहिती - Maharashtra 24

अखेरच्या क्षणी ITR भरताय? पाहा ऑनलाईन प्रक्रियेची A to Z माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । How to file income tax return online : आता हा इनकम टॅक्स रिटर्न नेमका फाईल कसा करायचा, त्यासाठीची प्रक्रिया काय, हे सर्व कोण करून देणार? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर, आताच एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही अगदी घरच्या घरीही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

# बरं, नंतर भरू म्हणत आयटीआर भरणं टाळू नका, कारण असं केल्या तुम्ही दंडास पात्र ठराल आणि करदाते म्हणून तुम्हाला 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

# आयटीआर भरण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, फॉर्म 16, फॉर्म 26AS असणं गरजेचं आहे. याशिवाय बँक खाते क्रमांक गुंतवणुकीची माहिती असा तपशील असणंही गरजेचं आहे.

# राहिला मुद्दा ITR File करण्याचा, तर सर्वप्रथम इनकम टॅक्सच्या संकेतस्थळाला भेट द्या. आता इथं पॅन आणि धारा क्रमांक वापरत तुमच्या खात्यात लॉगईन करा. तिथं ई फाइलिंगचा पर्याय निवडा.

# ज्या वर्षासाठी आयटीआर फाईल करत आहात तिथं आयटीआर फॉर्म क्रमांक, सबमिशन मोड निवडा आणि आवश्य तपशील भरा. तुमची अर्ध्याहून अधिक माहिती फॉर्म 16 आणि पॅनच्या आधारे तिथं भरलेली असेल. एकदा ती तपासून पाहा.

# तुम्ही कुठे गुंतवणूक केली आहे का, पगारातील Deductions नमूद आहेत का, नसल्यास ते करण्यावर लक्ष द्या. टप्प्याटप्प्यानं माहिती भरून पुढे आल्यानंतर अखेरच्या टप्प्यात संपूर्ण माहितीचा संक्षिप्त तपशील तुमच्यासमोर येईल. तोसुद्धा तपासून घ्या.

# पुढे Proceed to validation हा पर्याय निवडा आणि लागलीच ई वेरिफिकेशनही करून घ्या. यानंतर Submit या पर्यायावर क्लिक करा. साधारण अर्ध्या तासातच तुम्ही हे काम पूर्ण करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *