![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । Bhimashankar Road Closed : मंचर भिमाशंकर मार्गावर शिनोली शिंदेवाडी रोड खचल्याने भिमाशंकरला जाणा-या भाविकांची माेठी अडचण झाली आहे. या रस्त्यावरील वाहतुक एकेरी सुरु आहे. भाविकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पाेलिसांनी केले आहे. (Maharashtra News)
पुणे नाशिक महामार्ग असाे अथवा मंचर – भिमाशंकर रस्ता असाे या दाेन्ही रस्त्यांवर भिमाशंकरला जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. त्यातच मंचर भिमाशंकर मार्गावर शिनोली शिंदेवाडी रस्ता खचला आहे. या रस्त्याचे काम सुरु असताना रस्ता खचल्याने वाहनधारकांची अडचण झाली आहे.
एकेरी वाहतुक
आधिक श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार असल्याने भिमाशंकर मार्गावर गर्दी पाहावयास मिळत आहे. भिमाशंकर मार्गावरील मुख्य रस्ता खचल्याने वाहतुक कोंडी झाली आहे. घोडेगाव पोलिसांनी सध्या एकेरी वाहतुक सुरु करुन वाहतुक कोंडी सोडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
पर्यायी मार्ग
भिमाशंकरला जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पाेलिसांनी केले आहे. त्यानूसार राजगुरुनगर मार्गे वाडा डेहेणे मार्गे भिमाशंकर येथे देखील भाविकांना जाता येणे शक्य आहे.
