गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रेडझोनची समस्या न सुटल्याने नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने केली जाणार

Spread the love
  • सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचा ईशाराः पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन प्रश्न सोडविण्यात यावा

पिंपरीः २००१ सालाबाद पासून रेड झोन प्रश्न सोडविण्यात यावा म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक मागणी करत आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर राजनाथ सिंह, शरद पवार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे मात्र त्या संदर्भात अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. रेड झोन प्रश्न सोडविण्यात यावा म्हणून अधिवेशनात डॉ. निलमताई गोऱ्हे, उमा खापरे, सचिन आहेर यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन रेड झोन नकाशा प्रसिद्ध केला असून २००० यार्ड क्षेत्र रद्द करण्यात आले नसून, नागरिकांना नाहक वेठीस धरत आहे. परिणामी निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर वेळोवेळी आवाज उठवत निषेध नोंदवत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून पंतप्रधान मोदी यांचा तीव्र निषेध करण्याचा इशारा काळभोर यांनी दिला आहे.

निगडी, तळवडे, रुपीनगर, साने चौक, मोरे वस्ती, दुर्गा नगर, शरद नगर, जोतिबा नगर, पाटील नगर, बोपखेल, भोसरी, कासारवाडी, रावेत, दापोडी, फुगेवाडी, किवळे-रावेत, पिंपरी गावठाण, दिघी आदी ठिकाणी रेडझोन क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रावर बांधकाम परवाना देण्यात येत नाही. बँक लोन होत नाही रस्ते सुविधा उपलब्ध होत नाही लाईट पाणी पुरवठा संदर्भात अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांनमधून रोष व्यक्त होत आहे.

विशेष बाब म्हणजे, निगडी येथील सेक्टर 22 मध्ये जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत ९ इमारत बांधकाम संपूर्ण होऊन १२/१३ वर्ष झाली असून रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागेमध्ये बेकादेशीर बांधकाम केले म्हणून मुंबई उच्च न्यायालयात स्थगिती आदेश देण्यात आला असून, त्या संदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने स्थगिती आदेश उठवण्यासाठी प्रयत्न केले नसून, पात्र लाभार्थी यांना जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. ही खंत निगडीवासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *