‘महाराष्ट्रात खपवून घेणार नाही…’, प्रबोधनकारांचा दाखला देत ; मनसेचा शिरसाटांना इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ऑगस्ट । गेल्या दोन दिवसांपासून आमदार संजय शिरसाट यांनी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापलं आहे. प्रियंका चतुर्वेदी यांची सुंदरता पाहून आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला होता. यानंतर शिरसाट यांच्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे. मनसेनेही शिरसाट यांना लक्ष्य केलं आहे.

ट्वीटमध्ये मनसेने म्हटलं की, “महाशक्तीने मुकुट चढविलेलं हे ‘शीर’ विकृत विचारांचं ‘माठ’ आहे! प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, ‘महिलांबद्दलचा जितका आदर मनात साठवीत जाल, तितके शिवराय तुमच्यावर अधिक प्रसन्न होत जातील…’ त्याच प्रबोधनकार ठाकरेंच्या सुपुत्राचे म्हणजेच स्व. बाळासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करायचं आणि महाशक्ती पाठीशी आहे, म्हणून महिलांबद्दलची वाट्टेल ती विधानं करायची. हे महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही… अशांचं ‘शीर’ नेत्यांनी जाग्यावर आणावे. अन्यथा ते ‘शीर’ विकृत विचारांचं ‘माठ’ आहे असं महाराष्ट्रात प्रचलित होईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *