ठाण्यात समृद्धी महामार्गावर 100 फूट उंचीवरून पुलाचा गर्डर कोसळला; 16 ठार, अनेक जण दबल्याची भीती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । ठाण्यातील समृद्धी एक्सप्रेस हायवेवर सोमवारी रात्री उशिरा एक दुर्घटना घडली. शहापूरजवळ सरलांबे येथे महामार्गावरील पुलाचे बांधकाम सुरू असताना गर्डर लॉन्चिंग मशिन पडल्याने 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तिघे जखमी झाले आहेत.

महामार्गावर रात्री बांधकाम सुरू होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे गर्डर मशीन 100 फूट उंचीवरून पडले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताही अनेक मजूर दबलेले असण्याची भीती व्यक्त होत आहे.

बचावकार्य सुरू आहे. वास्तविक, गर्डर मशीनचे वजन जास्त असल्याने ते लवकर हटवण्यात अडचणीत येत आहेत. क्रेन आल्यानंतरच बचाव कार्याला वेग येईल. वृत्तानुसार, शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे 15 मृतदेह आणण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *