पिंपरी-चिंचवड पोलिस भरती पेपरफुटी‎ प्रकरण ; बीडच्या 33 जणांचा सहभाग‎, 20 अटकेत, 13 फरार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट । पिंपरी चिंचवड पोलिस‎ आयुक्तालयातील पोलिस भरतीमध्ये‎झालेल्या पेपरफुटी प्रकरणात बीड‎जिल्ह्यातील तब्बल ३३ आरोपी निष्पन्न‎झाले आहेत. यातील २० जणांना‎आतापर्यंत पोलिसांनी अटक केली‎असून १३ फरार आहेत. दरम्यान, या‎प्रकरणात राज्यभरात एकूण १४९ आरोपी‎आहेत यातील २२ टक्के आरोपी‎बीडमधील आहेत. त्यामुळे घोटाळ्यांचा‎बीड पॅटर्न पुन्हा चर्चेत आला आहे. फरार‎आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.‎

राज्य पाेलिस दलातील विविध‎जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी‎सन २०१९ मध्ये जाहीरात प्रसिद्ध झाली‎होती. त्यानंतर काेविडमुळे या प्रक्रियेतील‎परिक्षा लांबली होती. दरम्यान, २०२१‎मध्ये ही परिक्षा पार पडली होती. यात,‎पिंपरी चिंचवड पोलिस‎आयुक्तालयांतर्गत झालेल्या भरती‎प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार‎समोर आले होते. मैदानी, लेखी परीक्षेत‎हे गैरप्रकार झाले होते. सन २०२१ व सन‎२०२२ मध्ये या प्रकरणी एकूण ६ गुन्हे‎पिंपरी चिंचवड, हिंजवडी व निडी‎पोलिसांत नोंदवले गेले होते. या सर्व‎गुन्ह्यात एकूण १४९ आरोपी निष्पन्न झाले ‎‎आहेत.

दरम्यान, निगडी पोलिसांनी ‎‎आतापर्यंत अटक केलेल्या व फरार‎असलेल्या आरोपींची यादी २५ जुलै रोजी‎जाहीर केली गेली आहे. यात, अटक‎केलेल्या आरोपींमध्ये बीड जिल्ह्यातील‎२० जणांचा समावेश आहे तर, फरार‎असलेल्यांमध्ये १३ जणांचा समावेश‎आहे बहुतांश उमेदवार हे बीड‎तालुक्यातील घाटसावळी, ढेकणमोहा,‎अंथरवण पिंप्री, बकरवाडी, पालवण,‎ ससेवाडी, पिंपळनेर येथील आहेत हे‎ विशेष.‎

बनावट प्रमाणपत्र, मुंबई‎ प्रकरणातही रडारवर‎
२०२३ मध्ये झालेल्या पोलिस भरती‎प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट‎ प्रमाणपत्र सादर करुन समांतर‎ आरक्षणाचा लाभ घेण्याचा प्रकार समोर ‎आला होता. या प्रकरणात गडचिरोली,‎ यवतमाळ, लातूर, मिराभाईंदरसह इतर ‎‎ठिकाणी बीडच्य उमेदवारांवर गुन्हे नोंंद ‎‎आहेत. मुंबई पोलिस भरती प्रक्रियेत गत ‎‎महिन्यांत झालेल्या परिक्षेतील गैरप्रकारात ‎‎बीडचे काही जण संशयित आहेत.‎‎

आरोपींपैकी २२ % आरोपी जिल्ह्यातील‎

या २० जणांना झाली अटक‎
अनिल कैलास राठोड (रा. खांडवी ता.‎गेवराई), मोहन नारायण सावंत (आहेर‎चिंचोली ता. गेवराई), शुभर किरण उबाळे‎(मित्रनगर, बीड), अनुरथ दशरथ लांडे,‎अक्षय रामनाथ लांडे, महादेव अरुण लांडे,‎भाऊसाहेब रामनाथ लांडे, आकाश‎सुधाकर लांडे, महारुद्र अर्जून लांडे (सर्व ६‎रा. घाटसावळी ता. बीड), अंकुश मच्छिंद्र‎काळे, सिताराम उर्फ राम सखाराम खाडे‎(दोघे रा. बकरवाडी ता. बीड), गोरक्षनाथ‎पंडित भोगे, मुकेश ज्ञानेश्वर भिसे, संतोष‎भिमराव ससाणे ( तिघे रा. ढेकणमोहा ता.‎बीड), अरुण विक्रम पवार,अतुल‎आबासाहेब पवार ( दोघे रा. अंथरवणपिंप्री‎ता.बीड), अमोल संभाजी पारेकर,‎रख्माजी उर्फ सुधीर चतुर्भूज पारेकर‎(काळेवाडी ता. धारुर), अर्जुन विष्णू‎देवकते (कवडगाव ता. वडवणी), सचिन‎गणू पवार (तिरुपती कॉलनी, बीड) या २०‎जणांना आतापर्यंत अटक झाली आहे.‎

टीईटी, आरोग्य, म्हाडा भरतीतही बदनामी

आरोग्य विभागाच्या भरतीतही बीड‎जिल्ह्याचे कनेक्शन समोर आले होते तर, टीईटी घोटाळ्यातही बीडमधून अनेकांना‎अटक झाली होती. म्हाडाच्या भरतीतही डमी उमेदवार बसवले गेले होते. या सर्व‎प्रकारात बीडची मोठी बदनामी झाली होती.‎
१३ जण फरार, शोध सुरू

महेंद्र रवींद्र निसर्गंध (रा.‎आंबेसावळी ता. बीड), अशोक‎शेळके (बीड), शुभम उर्फ‎बाजीराव बाबासाहेब केवडे,‎पंुडलिक जालिंदर भोगे, प्रवीण‎वसंत फड (तिघे रा. घाटसावळी‎ता. बीड), विनोद अर्जुन मस्के‎(रा. पालवण ता. बीड), विजय‎संदिपान काळे (रा. बकरवाडी ता.‎बीड), तेजस संदिपान केदार‎(स्वराज्यनगर, बीड), बाळसाहेब‎अंकुश लांडे (रा. बीड), रवींद्र‎शेळके (रा. वांगी ता. बीड),‎दैवशाला बाबुराव घाटे (रा.‎पिंपळनेर), योगेश पाटील बर्डे‎(रा. बीड), कमलेश गोकुळ‎मिरगणे (रा. ससेवाडी ता. बीड)‎हे १३ जण अद्याप फरार असून‎पोलिसांनी त्यांची यादी जाहीर‎करुन शोध सुरू केला आहे.‎‎‎‎‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *