महेश लांडगे यांचे अधिवेशनात रौद्ररूप ; संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट । भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी अधिवेशनात सभागृह गाजवले. औरंगजेबाचे नाव घेणाऱ्या अबू आझमी यांना भर सभागृहात पैलवान महेश लांडगे यांनी झापले आहे. जर तू शिवाजी महाराजांना मानतो तर तुझा आणि औरंगजेबाचा संबंध काय? अशी विचारणा महेश लांडगे यांनी त्यांना केली. महेश लांडगे यांचे ते रौद्र रूप पाहून संपूर्ण सभागृह शांत झाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

औरंगजेबाला मानतो त्याचा शिवाजी महाराजांना मानण्याचा संबंध काय? सभागृहात आलेला प्रत्येक सदस्य हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आहे. जो कुणी मानत नसेल त्यांनी हात वर करावा, आणि जर मानत असेल तर त्याचा औरंगजेबाला मानण्याचा संबंध काय? ज्यांनी आमच्या राजाला छळलं आमच्या प्रजेला छळलं त्याला मानण्याचा संबंध काय असे देखील महेश लांडगे म्हणाले. तेव्हा अध्यक्ष महोदय अशा डोक्यात असणाऱ्या विकृतीना आपल्याला थांबवावे लागेल. यावर आपण काय कारवाई करणार असा प्रश्न महेश लांडगे यांनी उपस्थित केला. मात्र, महेश लांडगे यांच्या या रुद्रावताराने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. मात्र, महेश लांडगे यांच्या या रुपाने रमेश वांजले यांच्या २०१२साली अबू आझमी यांच्या हिंदीतून शपथ घेताना माईक हिसकावल्याच्या प्रसंगाची आठवण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *