जयंत पाटील यांचा खोचक सवाल आणि सभागृहात हास्यकल्लोळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट । विधानसभेत आज चांगलीच टोलेबाजी बघायला मिळाली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याची घोषणा झाल्यानंतर सताधाऱ्यांकडून चांगलीच टोलेबाजी करण्यात आली. या दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विचारलेल्या एका प्रश्नावरुनही चांगलीच टोलेबाजी बघायला मिळाली. राज्यात उपुमख्यमंत्री नंबर 1 आणि नंबर 2 कोण? असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला. जयंत पाटील यांच्या या सवालावरुन चांगलीच टोलेबाजी बघायला मिळाली.


जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
“अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षनेत्यांचं महत्त्व एवढं आहे की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मागून येणाऱ्या आमदारांकडे लक्ष देण्याऐवजी विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात होणाऱ्या वर्णनांच्या भाषणाकडे जास्त लक्ष दिलं जातं”, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “आमचं दोघांचं लक्ष तुमच्याकडेच आहे. पण तुमचं आमच्याकडे लक्ष नाही”, असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर सभागृहात एकच हास्यकल्लोळ बघायला मिळाला. त्यानंतर जयंत पाटील यांनी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.

“मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की, उपमुख्यमंत्री नंबर 1 कोण आणि नंबर 2 कोण?”, असा सवाल अजित पवार यांनी केला. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. “नंबर वन हे (देवेंद्र फडणवीस)… नंबर 2 मी”, असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.

“मुख्यमंत्र्यांनी हे सांगायला पाहिजे, पण बाकीचेच सांगत आहेत. कसं होणार?”, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे बोट दाखवत नंबर वन आणि नंबर दोन असं म्हटलं.

 

‘अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीची पूजा केली पाहिजे’
“अध्यक्ष महोदय, माझ्या मनात एक प्रश्न आला, ती जी खुर्ची आहे (विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची), मी एकनाथ शिंदे यांनाच विचारणार होतो, पण मला वेळ मिळाला नाही. त्या खुर्चीची पूजा केली पाहिजे. पंचमहाभूताची पूजा किंवा काहीतरी पूजा केली पाहिजे. कारण जो तो खुर्चीवर बसतो, मलाही बसायचं होतं. पण छगन भुजबळ म्हणाले, जयंत थांब रे तू आता, तू कशाला, तू पक्ष बघ, अजित दादा विरोधी पक्ष होती. भुजबळ यांनी निवाडा दिला. पण नशिब कसं असतं बघा, जो त्या खुर्चीवर जातो, तो तिकडे जावून बसतो”, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *