भाजपकडून शिरुरची समन्वयक म्हणून जबाबदारी आता राजेश पांडेंवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । Pune BJP News : भाजपचे पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. जी 20 परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात होणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमांचे ‘प्रदेश संयोजक’ म्हणून राजेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना या नियुक्तीचे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

भाजप नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. आता या ठिकाणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही. कारण त्यांच्या निधनानंतर अजूनही पोटनिवडणूक जाहीर झाली नाही. यामुळे भाजपने मिशन 2024 ची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी लोकसभा मतदार संघानुसार जबाबदारी निश्चित केली गेली आहे. 

काय केले बदल
पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात समन्वयक भाजपकडून नेमले आहे. पुणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिली होती. त्यानंतर शरद पवार यांचे वर्चस्व असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे दिली. तसेच जून महिन्यात शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली होती. परंतु आता शिरुरची जबाबदारी महेश लांडगे यांच्याकडून काढून घेतली आहे. आता ही जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे दिली आहे.

कोण आहेत राजेश पांडे
राजेश पांडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून भाजपमध्ये आले आहेत. अभविपचे प्रदेशाध्यक्ष ते होते. त्यावेळी अभिविपचे संघटन त्यांनी मोठ्या कौशाल्याने सांभाळले होते. आता भाजपचे ते उपाध्यक्ष आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. पुणे विद्यापीठ आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राधिकरणावर त्यांनी काम केले आहे.

राजेश पांडे यांच्यावर आणखी एक जबाबदारी
राजेश पांडे यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून मांडलेली ‘मेरी माटी, मेरा देश’ या देशव्यापी अभियानाची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे. या अभियानाच्या संजोयकपदी राजेश पांडे यना नेमले आहे. देशासाठी प्राणांची बाजी लावलेल्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्वानिमित्ताने मेरी माटी मेरा देश हा उपक्रम साकरला जात आहे. या उपक्रमाची महाराष्ट्राची जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे दिली गेली आहे. या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *