Reciepe : पावसाळ्यात बनवा हा झणझणीत खमंग पदार्थ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । पावसाळ्यात चहासोबत काहीतरी गरमागरम खावेसे वाटते. (Kothimbir Vadi Reciepe ) खमंग तिखट कोथिंबीरची वडी खायला मिळाली तर मस्तच . कमी वेळेत सहज सोपी असणारी ही रेसिपी जरा हटके आहे. पण सर्वचजण खातील, इतकी चविष्ट आहे. खमंग तिखट कोथिंबीर वडी कशी बनवायची हे जाणून घ्या. (Kothimbir Vadi Reciepe)

तांदुळ पीठ – एक वाटी

पांढरे तीळ – एक चमचा

जिरे – १ चमचा

हळद- १ चमचा

मीठ-चवीनुसार

पाणी

लाल तिखट

तेल – तळण्यासाठी

आलं-लसुण पेस्ट

हिरव्या मिरच्या


कृती –
प्रथम कोथिंबीर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. ती बारीक चिरून घ्या. आता एका मोठ्या बाऊलमध्ये कोथिंबीर, एक मोठा कप बेसन घाला. त्यात १ वाटी तांदळाचे पीठ घाला. आता मिक्सरमध्ये आले, लसुण, हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ एकत्र करून मिश्रण करून घ्या. आता हे सर्व एकत्र करू घ्या. वरून हळद, तिखट घाला. पीठ एकजीव करून घ्या.

आता एका मोठ्या प्लेटवर तेल लावून घ्या. त्याच्यावर हे पीठ हाताने चांगले पसरवून घ्या. त्यावर पांढरे तीळ टाका. चाकूने काप (वड्या) पाडून घ्या.
दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करून घ्या. एक एक वड्या तळून घ्या. तुम्ही पीठामध्ये खाण्याचा सोडा देखील टाकू शकता. खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडीचा जेवणासोबत आस्वाद घ्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *