महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 4 ऑगस्ट । कोरोना काळातीळ निर्बंध व गणेश मूर्तींच्या उंचीवरील मर्यादेमुळे मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांवर मोठ्या आर्थिक संकट आले होते. यावर्षी सरकारने गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा उठवल्याने गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे. नंदुरबार (Nandurbar) शहरात गणेश मूर्ती बनवणारे लहान मोठे १०० कारखाने असून हजारो गणेश मूर्ती साकारल्या गेले आहेत. सात इंचापासून तर २२ फुटापर्यंत (Ganesh Festival) उंचीच्या मूर्ती तयार झाल्या असून यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतीत ३० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. (Tajya Batmya)
पेननंतर नंदुरबारच्या गणेशमूर्तींना बाजारात मोठी मागणी असते. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विविध भागात नंदुरबारमधून गणेश मुर्ती जात असतात. यावर्षी मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली असून त्यामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत तीस टक्क्यांनी वाढणार आहेत. तर दुसरीकडे गणेश मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध सरकारने उठवल्याने सार्वजनिक मंडळाच्या वतीने मोठमोठ्या गणेश मुर्ती यांची मागणी वाढली आहे; अशी माहिती मूर्तिकार नारायण वाघ यांनी दिले आहे.
बुकिंग झाली सुरु
सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठ्या मूर्तींची बुकिंग सुरू झाली असून मंडळाचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून नंदुरबार येथील गणपती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये येत असून आतापासूनच आपल्या मंडळासाठीच्या मूर्ती बुक करून घेत आहेत. यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतींमध्ये ३० टक्केपेक्षा अधिकची वाढ होणार असल्याने लहान मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे.