IAS आणि IPS यांच्यात कोणाकडे असतात जास्त अधिकार ; दोघांमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 4 ऑगस्ट । IAS Vs IPS Salary: केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांची IAS, IPS, IES किंवा IFS सारखे अधिकारी म्हणून निवड केली जाते. मात्र या सर्व अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती आयएएस आणि आयपीएसची. (Difference Between IAS and IPS)

आयएएस आणि आयपीएस एकमेकांना पूरक आहेत आणि दोन्ही पदांची स्वतःची वेगळी अशी प्रतिष्ठा आहे. त्यापैकी एक साधा वेशातील अधिकारी तर दुसरा पोलिसांच्या गणवेशातील अधिकारी देशाची सेवा करतात. (Who earns more IPS or IAS?)

IAS-IPS ची निवड कशी होते
आयएएस आणि आयपीएसची निवड यूपीएससी परीक्षेच्या निकालाच्या आधारे केली जाते. आयएएस, आयपीएस किंवा आयएफएसची निवड त्यांच्या रँकिंगवर आधारित आहे. टॉप रँकर्सना आयएएस पोस्ट मिळते. परंतु काहीवेळा टॉप रँकर्सचे आयपीएस किंवा आयएफएसला प्राधान्य असते. तर खालच्या रँकर्सनाही आयएएस पोस्ट मिळू शकते. यानंतर रँक करणाऱ्यांना आयपीएस आणि आयएफएस पदे मिळतात. (Latest Marathi News)

IAS आणि IPS प्रशिक्षण
या परीक्षेत निवडलेले उमेदवार लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA), मसूरी येथे पायाभूत प्रशिक्षण घेतात. प्रत्येकाला 3 महिने प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये मूलभूत प्रशासकीय कौशल्ये शिकवली जातात, जी प्रत्येक नागरी सेवा अधिकाऱ्याला माहित असणे आवश्यक आहे. 3 महिन्यांनंतर IAS आणि IPS च्या प्रशिक्षणात खूप फरक येतो.

यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांना हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA) येथे पाठवले जाते, जिथे त्यांना पोलीस प्रशिक्षण दिले जाते. या दरम्यान आयपीएस यांना घोडेस्वारी, परेड आणि शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच आयएस त्यांचे प्रशिक्षण मसुरीतच पूर्ण करतात. त्यानंतर दोघांचे व्यावसायिक प्रशिक्षण सुरू होते आणि यामध्ये प्रशासन, पोलिसिंग या प्रत्येक क्षेत्राची माहिती दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *