महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. सिसोदिया यांनी पत्नीच्या तब्येतीचे कारण सांगून जामिनासाठी याचिका केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदीया आरोपी आहेत. ते दिल्लीच्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सिसोदीया यांच्या अंतरिम जामिन याचिकेवर 4 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. सिसोदीया यांनी पत्नी आजारपणाचे कारण सांगून जामिन अर्ज दाखल केला होता. न्यायाधिश संजीव खन्ना आणि एसवीएन भट्टी यांच्या खंडपीठाने निर्णय देताना अधोरेखित केले की, सिसोदीया यांच्या पत्नीचे वैद्यकीय रेकॉर्ड पुनरावलोकन केले असता त्यांची बऱ्यापैकी तब्येत स्थिर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने 14 जुलै रोजी सीबीआय आणि ईडी ला आदेश दिला होता की, सिसोदिया यांच्याकडून आलेल्या जामिन अर्जावर प्रतिक्रिया देण्यास सांगितली होती. गुरुवारी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाला सिसोदिया यांना जामिन मिळू नये असे सांगितले आहे. तपास संस्थांनी आरोप केला आहे की, सिसोदीया हे मद्य घोटाळ्यातील सहआरोपी आहेत.