महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ ऑगस्ट । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सहकार खात्याच्या कार्यक्रमासाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. ६) चिंचवडमधील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. काही मार्ग बंद केले असून, या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्ता सुचविण्यात आला आहे.
असे असतील बदल…
महावीर चौक ः महावीर चौकाकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी रस्ता – ही वाहने महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.
दर्शन हॉल लिंक रोड ः लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे. पर्यायी रस्ता- ही वाहने मोरया हॉस्पिटल चौकाकडून इच्छित स्थळी जातील.
रिव्हर व्ह्यू चौक ः अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी रस्ता – ही वाहने या चौकाकडून वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.
वरील वाहतूक बदल हे रविवारी (ता. ६) सकाळी आठ ते दुपारी तीनपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी सांगितले.