महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ ऑगस्ट । मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
रविवारमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची संख्या वाढल्याने पुण्याकडे येणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे.