महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ ऑगस्ट । गेल्या काही दिवसापासून सातारा शहराला पावसाने झोडपून काढले आहे. मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. तर रस्त्यात पडलेल्या मोठ मोठ्या खड्यांकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचेही समोर येत आहे. येथील शहरा लगत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्यांमुळे जवळपास पंधरा गाड्यांचे टायर फुटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच खड्ड्यांमुळे गाड्यांचे नुकसान देखील होत आहे.