SSC HSC Exam: दहावी, बारावी परीक्षेच्या Form 17 ची प्रक्रिया उद्यापासून

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । SSC HSC Exam : दहावी, बारावीच्‍या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेत खासगीरीत्या प्रविष्ट होऊ इच्‍छिणाऱ्यांसाठी फॉर्म १७ भरण्याची प्रक्रिया गुरुवार (ता. १०) पासून सुरू होत आहे.

शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्‍या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ११ सप्‍टेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे. (Form 17 process of 10th 12th exam from tomorrow nashik)


फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी फॉर्म १७ भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे.

विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, नोंदणी शुल्‍क जमा केल्‍याबाबत पोचपावतीच्‍या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्यासाठी १३ सप्‍टेंबरपर्यंत मुदत असेल.

शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची यादी १५ सप्‍टेंबरपर्यंत शिक्षण मंडळाकडे कळवायची आहे.

दहावीचे अर्ज सर्व शाळांतून

यापूर्वीच्‍या प्रक्रियेनुसार दहावीच्‍या परीक्षेत खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपर्क केंद्रामार्फत नावनोंदणी प्रक्रिया राबविली जायची. प्रचलित पद्धतीमधील अडचणी, त्रुटींचा विचार करून धोरणात्‍मक बदल केला आहे.

जास्‍तीत जास्‍त विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळावी, या उद्देशाने सध्याची संपर्क केंद्र शाळेमार्फत नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

बारावीकरिता सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतून नावनोंदणी अर्ज स्वीकारले जातात, त्‍याधर्तीवर दहावीच्‍या विद्यार्थ्यांची नावनोंदणी अर्ज सर्व मान्‍यताप्राप्त शाळांमधून स्वीकारले जाणार आहेत.

शिक्षण प्रवाहाच्‍या बाहेर राहिलेल्‍या परंतु किमान पाचवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावीच्‍या परीक्षेत बसून शिक्षणाच्‍या प्रवाहात येण्याची संधी उपलब्‍ध करून देण्याचे आवाहन शिक्षण मंडळाने शाळांना केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *