Subhedar Trailer: सुभेदार सिनेमाच्या ट्रेलरची हवा, अवघ्या २४ तासात केला वर्ल्ड रेकॉर्ड

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । सुभेदार सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सुभेदार सिनेमाचा ट्रेलर सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या अनेक दिवसांपासुन सुभेदारच्या ट्रेलरची सर्वांना उत्सुकता होती.सुभेदार सिनेमाचा थराराक आणि अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. सुभेदार सिनेमाच्या ट्रेलरने अल्पावधीत वर्ल्ड रेकॉर्ड.

सुभेदार सिनेमाच्या ट्रेलरने केला वर्ल्ड रेकॉर्ड
सुभेदार सिनेमाच्या ट्रेलरने १ मिलीयन व्ह्युजचा टप्पा ओलांडला आहे. सुभेदारच्या ट्रेलरने अवघ्या २४ तासांमध्ये हा विक्रम केलाय. इतकंच नव्हे तर हा ट्रेलर ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

सुभेदार सिनेमाची उत्सुकता
तान्हाजी मालुसरेंच्या भुमिकेत अजय पुरकर झळकत आहेत. सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, तर त्यांच्या पत्नी यशोदाबाईंची भूमिका शिवानी रांगोळे हिने साकारली आहे.

मालुसरे कुटुंबीयतील महत्वाचे सदस्य असलेल्या शेलारमामांच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी दिसणार आहे.

तान्हाजीरावांच्या आईची भुमिका पार्वतीबाईंच्या भूमिकेत उमा सरदेशमुख आणि रायबाची भुमिका अर्णव पेंढारकर दिसत आहे. याशिवाय स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे असे कलाकार या सिनेमात दिसतेय.

सुभेदार सिनेमाची रिलीज डेट बदलली

सुभेदार सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झाल्यावर सिनेमाविषयी मोठी अपडेट समोर आलीय. सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे.

सुभेदार सिनेमा २५ ऑगस्टला रिलीज होणार होता. पण आता मात्र सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे. सिनेमा आता एक आठवडा आधी म्हणजे १८ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *